धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने बी. टेक. प्रथम वर्षाचा दुसरा पालक मेळावा दूरस्थ प्रणालीद्वारे उत्साहात संपन्न झाला.
या पालक मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व महाविद्यालय यांच्यातील संवाद वाढविणे हा होता.
पालक, सर्व विषय शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्यात संवाद साधण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विषयांवरील कामगिरी, वर्गातील शिस्त आणि त्यांच्या उपस्थितीची टक्केवारी यावरही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सर्व विषयांमधील त्यांच्या Continuous Assessment -I आणि Mid Semester exam या गुणांवर पालकांशी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने व परिचयाने झाली. त्यामध्ये प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्याचबरोबर पालकांना संबोधित करताना म्हणाले की, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अद्ययावत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. यामध्ये शिक्षकांइतकाच पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच महाविद्यालयातील अध्यापक कक्ष अद्ययावत आहेत. गतवर्षी आमच्या महाविद्यालयाचा निकाल विद्यापीठात अमूल्य आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही राहील .याची खात्री आहे. असे प्रतिपादन तेरणा इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर यांनी केले. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते.
तसेच महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष बी. टेक. विभागाच्या विभागप्रमुख डॉ. यु. के. वडणे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन बेसिक सायन्स अँड ह्युमॅनिटीझ विभागाच्या विभागप्रमुख डॉ. उषा वडणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना केले.
त्यावेळी डॉ. उषा वडणे यांनी विभागात आयोजित विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्यक्रमाची सविस्तर माहिती पालकांना पीपीटीच्या माध्यमातून दिली. तसेच त्याचबरोबर महाविद्यालयात झालेल्या Continuous Assessment -I आणि Mid Semester exam च्या विद्यार्थ्यांच्या गुणांची आकडेवारी सांगितली. व त्याचबरोबर सध्या महाविद्यालयात चालू असलेल्या सराव परिक्षेबाबतही सांगितले. सराव परिक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावरील परीक्षेचे स्वरूप हे लक्षात येते.तसेच वेळेचे नियोजन करता येते. व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील असलेली परीक्षे संदर्भातील भीती ही नाहिशी होते. अशा प्रकारे डॉ. वडणे मॅडम यांनी सराव परिक्षा घेण्याबाबतचा उद्देश स्पष्ट केला. व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थितीही दर्शवली. तसेच विद्यार्थ्यांच्या मुलभूत शैक्षणिक पायाभरणीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचीही माहिती सांगितली. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात देत आहेत.या घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात मोठ्या संख्येने सर्व पालक हे आपापल्या पाल्याबरोबर उपस्थित होते. कॉलेजच्या प्लेसमेंट सेल मार्फत येणाऱ्या विविध कंपन्या आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या रोजगाराची संधीची माहिती पालकांना देण्यात आली. त्यामध्ये अनेक पालकांनी कॉलेजमधील असलेल्या सोयी -सुविधांबद्दल आपले समाधान व्यक्त केले. या पालक मेळाव्यामध्ये आनंद सुरवसे सर, काटमोरे सर , वाघमारे सर, घोडके सर, सरवदे सर, कवठेकर मॅडम , लक्ष्मण गव्हाणे सर , मोडिवले सर या पालकांनी आपली मते मांडली. तसेच पालकांनी महाविद्यालयाची कार्यप्रणाली व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी श्रद्धा कानडे, यशोदा गव्हाणे या विद्यार्थ्यांनी आपापली मते व्यक्त केली. तर काहींनी आपल्या इच्छा व्यक्त केल्या. त्यावेळी महाविद्यालयाकडून त्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यात आले.
पालक मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. बी. एस. चव्हाण, प्रा. एम. व्ही. जोशी, प्रा. दयानंद मुंढे, प्रा. वर्षा पाटील, डॉ. आर. एस. यादव, प्रा. ए. डी. बोरकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, प्रा. एस. एस. इंगळे, प्रा. सी. जी. न्हावकर, नेपते, वाघमोडे, दिगंबर जाधव तसेच वसतिगृहातील पाटील मॅडम यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. व्ही. जोशी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. व्ही. डी. पाटील यांनी मानले.
