परंडा (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याची बैठक रविवार दि. 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
परंडा येथे कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात 4 जानेवारी रोजी रविवारी दुपारी 12.30 वाजता होणाऱ्या या बैठकीस भाजपा नेते मा.आ.
सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, बुथ अध्यक्ष, आघाडी व मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे व परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे यांनी केले आहे.
