कळंब (प्रतिनिधी)- येथील उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष महसूल सहाय्यक अधिकारी दिनेश गोरख मांडलिक यांचा वाढदिवसानिमित्त कळंब येथील उपविभागीय कार्यालयात सेतू सुविधा केंद्र संचालक व मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने वाढदिवसा निमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,सेतु सुविधा केंद्र संचालक नटराज गायकवाड, सुनील पाटोळे, दीपक दळवी, बाबासाहेब टोपे, कर्मचारी धनराज पिसुरे, बबन जाधवर यांच्या सह नागरीक उपस्थित होते.
