तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर येथे दिनांक 19 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत वार्षिक क्रीडा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. सदरील क्रीडा स्पर्धेचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन माया माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री वैजनाथ घोडके यांनी मा तहसीलदार यांचे पुस्तक भेट देवून सत्कार केले .
याप्रसंगी विविध खेळातील राष्ट्रीय खेळाडू कु चव्हाण सार्थक, गौडा वंकट, जमादार प्रज्वल, कदम महारुद्र यांचा सत्कार करण्यात आला. अभ्यासासोबत शरीर तंदुरुस्त राहण्याकरीता व्यायाम व खेळ हे महत्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांनी आणखीन मेहनत घ्यावी व विविध क्रीडाप्रकारात यश मिळवावेत अशा शुभेच्छा दिल्या. संस्था विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.