धाराशिव (प्रतिनिधी)- समाज आणि शिक्षण व्यवस्था जोडण्याचे कार्य शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी केले असल्याचे प्रतिपादन प्रा. ए.डी जाधव यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन प्राचार्य, तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सह विभाग प्रमुख डॉ. जयसिंग देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. ए.डी. जाधव बोलत होते.
प्रा. जाधव म्हणाले की,बापूजींनी अभ्यासु शिक्षक नेमले व शिक्षण देण्याचे काम केले. बापूजींचा स्वभाव स्वावलंबी होता. परीपक्व बुध्दीमत्ता असलेले माणसं जेव्हा सकारात्मक सामाजिक कार्य करत असतात तेंव्हा समाजात चांगले नेतृत्व उदयास येत असते असे सांगितले. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी आज बापूजींना समजून घेणे समाजासाठी क्रमप्राप्त आहे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संदीप देशमुख म्हणाले की, आपल्या समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे संस्काराशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. कारण आपल्याला जर सभ्य समाजाचे निर्मिती करावयाची असेल तर संस्कारक्षम शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
या प्रसंगी व्याख्यानाचे आयोजक महाविद्यालयाचे ग्रंथापाल डॉ. मदनसिंह गोलवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर प्रसंगी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. बबन सुर्यवंशी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मंगेश भोसले, डॉ. बालाजी गुंड यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले. तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.
