भूम (प्रतिनिधी)- भारतीय स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिवसेना युवा सेना धाराशिव व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने जि प शाळा बऱ्हाणपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. 

 युवा सेनेचे पांडुरंग धस मुख्याध्यापक बाबा पठाण शिक्षिका सुनीता नवले शालेय समिती अध्यक्ष शकुंतला पाटील व विद्यार्थी यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत, स्त्री शिक्षण, समानता व सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता सादरीकरण तसेच प्रेरणादायी विचारांचे वाचन केले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन युवा सेनेचे पांडुरंग धस यांनी करण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.

 
Top