तुळजापूर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष प्राचार्य डॉ.जीवन पवार यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत स्त्री शिक्षण, सामाजिक समता व न्यायासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील रूढी, अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. शैक्षणिक व स्त्री शिक्षण, सामाजिक समता व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून समाजात परिवर्तनाची चळवळ उभी केली. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाचा दिवा तेवत ठेवत अनेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्या कार्यामुळे आज समाज अधिक प्रगत व सुसंस्कृत होत आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रमुख व्याख्याते प्रा. स्वाती बैनवाड यांनी सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा दिवा समाजात पेटवला. मुलींच्या शिक्षणासाठी समाजातील टीका, अपमान व अन्याय सहन करत त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, समानता व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते. सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही प्रेरणादायी असून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एफ. एम. तांबोळी यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीमती राणुबाई कोरे यांनी केले या कार्यक्रमास डॉ. बापुराव पवार, डॉ.नेताजी काळे,प्रा. बालाजी कऱ्हाडे, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ.जीवन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला.
