वाशी (प्रतिनिधी)- शनिवारी (दि.३) रोजी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.ए.बी.कदम,तर प्रमुख पाहुणे म्हणून ईट तालुका भूम येथील प्रताप  देशमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी पालक मेळाव्याला संबोधित करताना आपल्या विचारातून विद्यार्थ्यांनी स्वयं कलागुणांना वाव द्यावा. तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगती करावी .पालकांनी विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत यामुळे विद्यार्थी पालक नाते घट्ट होईल असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयीन शिक्षणाचे महत्त्व काळाची गरज हे ओळखून शिक्षण घ्यावे. समाजाच्या उपयोगी येईल असे शिक्षण आज गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील भौतिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असेही मत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती प्रा. हेमंत शिंदे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष यांची होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मिलिंद.शिंदे , सूत्रसंचालन प्रा. सुनिल आवारे तर कार्यक्रमाचे आभार  अनिता लांडगे मॅडम यांनी मांडले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 

 
Top