कळंब (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा ता. कळंब येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात बालिका दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.राजश्री राहूल वायसे , इंजि.सौ.सुषमा वायसे, बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रुपाली हारे व उपस्थित सावित्रीच्या लेकींच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थिनीं व्यासपीठावर खुप मोठया संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून दिली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.राज्यश्री वायसे,इंजि. सुषमा वायसे, महीला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रुपाली हारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपक्रमशील शिक्षिका सौ.शिवानंदा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी एकांकिका मी सावित्री बोलते व पथनाट्य यांचे सादरीकरण केले.  शिक्षिका शिवनंदा स्वामी यांनी रांगोळीच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सुंदर असे रेखाटन केले. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार या विषयावर सविस्तर असे व्याख्यान शिवव्याख्याते श्री महादेव खराटे यांनी दिले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याची माहिती मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी दिली. कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेल्या सर्व विद्यार्थिनींना शाळेच्या वतीने लेखणी देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव खराटे, प्रस्ताविक शिवनंदा स्वामी व आभार प्रदर्शन तुकाराम कराळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक बलभीम राऊत व  स्वयंसेवक बापू हगारे यांनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा यांच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top