धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव  येथील केदार गुलाब सूर्यवंशी याची राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सांजा गाव येथील प्रगतशील शेतकरी गुलाब सूर्यवंशी यांचा तो सुपुत्र असून सध्या धाराशिव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे शिक्षण घेत आहे.

छत्रपती शिवाजी विद्यालयातील हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक संजय उर्फ दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केदार सूर्यवंशी याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली होती. राज्यस्तरीय स्पर्धा अकोला येथे पार पडल्यानंतर केदार याची राष्ट्रीय हॉलीबॉल साठी निवड झाली आहे. हिमाचल प्रदेशातील सिमुर येथे 4 ते 9 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होत आहे.  विशेष म्हणजे गुलाब सूर्यवंशी यांचे तिन्ही मुले उत्कृष्ट हॉलीबॉल खेळतात. केदार, सत्यम आणि शिवम सूर्यवंशी हे दादा देशमुख यांच्या अधिपत्याखाली हॉलीबॉलचा नियमित सराव करीत आहेत. या निवडीचे क्रीडाप्रेमी नागरिकांनी स्वागत करून क्रीडा प्रशिक्षक संजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व खेळाडू, शिक्षक, पालक उपस्थित होते.


 
Top