धाराशिव (प्रतिनिधी)- भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मसला (खुर्द), ता. तुळजापूर येथे एकूण रु. ५३ लक्ष निधीतून विविध विकासकामांचे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. शिक्षण आणि सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या दिनी विकासकामांना सुरुवात होणे ही विशेष अभिमानाची बाब ठरली.

गावातील शैक्षणिक सुविधा बळकट करताना जिल्हा परिषद शाळेसाठी रु. २५ लक्ष खर्चून बांधण्यात आलेल्या २ नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक दर्जेदार आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण होणार आहे.

गावातील पायाभूत सुविधांचा विकास या उद्देशाने गावातील विविध भागांत एकूण रु. २८ लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्यामध्ये भीमनगर  रु. ८ लक्ष, रमाई नगर रु. ०५ लक्ष, अण्णाभाऊ साठे नगर रु. १० लक्ष आणि सावित्रीबाई फुले नगर रु.०५ या सिमेंट रस्त्याच्या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांमुळे ग्रामस्थांना दळणवळणाच्या सोयीसह सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यावेळी रामेश्वर वैद्य,  निशिगंधा पाटील, उमेश पाटील, युवराज शिंदे, दयानंद शिंदे,  मेघराज बागल,  नवनाथ कदम, अनिल शिंदे,  सुदर्शन जाधव, हरिभाऊ काळदाते,  प्रवीण दळवी, सुनील घोडके, शरद खराडे, श्रीराम खराडे, भाग्यश्रीताई खराडे, ज्योतीताई बेले, उज्वलाताई इंगळे, मंगलताई सुतार यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-शिक्षिका, पालकवर्ग, प्रमुख कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षण, समता आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारित सावित्रीबाईंच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे, असे अर्चनाताई पाटील यांनी म्हंटले.

 
Top