कळंब (प्रतिनिधी)-  कळंब.कळंब येथील श्री बालाजी मंदिरात  भव्य दिव्य कल्याण उत्सव शुभविवाह चे आयोजन करण्यात आले होते. दि13 जानेवारी मंगळवार रोजी श्री गोदा (लक्ष्मी) आणि श्री रंगनाथ (बालाजी) यांचा  शुभविवाह  हजारो भक्तांच्या  साक्षीने  भक्ती भावात संपन्न  झाला. दि 16 डिसेंबर पासून सुरू असलेल्या धनुर्मास उत्सवाची सांगता या कल्याण उत्सवाने झाली. आकर्षक रोषणाई , फुलांचे तोरण, केळीची पाने , रंगीबेरंगी कापड याने मंदिराच्या सभागृहाला भव्य लग्न मंडपाची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी चार वाजता आकर्षक रथा मधून श्री रंगनाथ यांची वरात मिरवणूक वाजत गाजत निघाली. स्त्रियांच्या लाल साड्या तर पुरुषांचे पांढरे कपडे व गुलाबी फेटा याने वराती मधील शिस्तबद्धता व उल्हास हे विशेष आकर्षण ठरले.फटाक्यांची आतिषबाजी, फुगडी आणि गरबा नृत्याने वरात सजली होती. वर श्री रंगनाथ आणि वधू श्रीगोदा यांना लग्न मंडपात मोठ्या उत्साहाने  पुष्पवृष्टी करत आणले गेले.यजमान आणि उपस्थित भक्तांना द्वारे श्रीगोदा (लक्ष्मी ) कन्यादान विधी पूर्ण करण्यात आला. विश्वकसेन पूजा, मंगलाष्टक आणि अक्षता  मुख्य पुजारी श्री रामाप्रपान्नाचार्य (मोनूजी महाराज )  यांच्या हस्ते हा  गोदा कल्याण उत्सव संपन्न झाला 

गोदा कल्याणम हा प्रामुख्याने दक्षिण भारतात साजरा केला जाणारा एक अत्यंत पवित्र आणि शुभ उत्सव आहे.गोदा देवी (लक्ष्मी) आणि भगवान रंगनाथ (बालाजी) यांच्या दिव्य विवाहाचे प्रतीक आहे. अलवर संतांमध्ये गोदा देवी ही एकमेव महिला संत होती. गोदा देवी ना लक्ष्मीचा अवतार आणि भक्तीचे सर्वोच्च अवतार मानले जाते.भगवान विष्णूला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी गोदा देवी ने  धनुर्मासात  थिरुपवै नावाचा उपवास केला.हा उत्सव भक्त आणि देवतेच्या मिलनाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की या कल्याणममध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंद, शांती मिळते आणि अविवाहित लोकांना योग्य जीवनसाथी मिळतो.

असा अध्यात्मिक मान्यता  असलेला तिरुपती येथील उत्सव कळंब बालाजी मंदिरात भव्य प्रमाणात साजरा केला गेल्या असल्याने अनेक बालाजी भक्तांना हो पवित्र पर्वणी च होती. शुभ विवाहनंतर हजारो भाविकानी प्रसादाच लाभ घेतला.  श्री बालाजी मंदिरात असे भव्य आणि पवित्र उत्सव साजरे होतं असल्याने भक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top