धाराशिव (प्रतिनिधी)- येथील नुतन विद्यामंदिरात सुरुवातीस राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे  होते . यावेळी प्रशालेतील बाल वक्त्यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब  व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली तसेच विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ माँसाहेब  व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा केल्या होत्या .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष माळी, चेतन माशाळकर,  पौळ  सर,  चित्रा सोनटक्के, दिपाली सुरवसे, सारिका उमरकर, दिपाली राऊत यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  यमुना जाधवर यांनी केले तर आभार प्रदर्शन तृप्ती तिकोने यांनी केले.

 
Top