धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरासह जिल्ह्यात रंगपंचमी मोठ्या उत्साहात रंगाची उधळण करत साजरी करण्यात आली.
होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्याची पध्दत नाशिक, सोलापूर, धाराशिव सह अनेक जिल्ह्यात आहे. रविवार दि. 8 मार्च रोजी रंगपंचमीनिमित्त बालगोपाळांनी सकाळपासूनच पिचकारीने एकमेकांच्या अंगावर रंग टाकण्यास सुरूवात केली. शहरासह जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी बाजारपेठ रंगपंचमीमुळे बंद होत्या. रंगपंचमी रविवार आल्यामुळे शाळा, कॉलेजला सुट्टी असल्यामुळे विविध रस्त्यावर युवक वर्ग मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी करत असल्याचे पहायला मिळाले.

