तुळजापूर(प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी येथील महालक्ष्मी मंदीरातील महालक्ष्मीच्या अंगावरील 36.5 ग्रॅम वजनाचे दागिने रविवार दि. 13 एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता चोरुन नेल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी कटारे मिल तामलवाडी येथील महालक्ष्मी मंदीराचे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून आत प्रवेश करुन महालक्ष्मीच्या अंगावरील 36.2(36.5) ग्रॅम वजनाचे दागिने व रिकामी लाकडी पेठी असे एकुण 1 लाख 40 हजार रूपये किंमतीचे चोरुन नेले. अशी फिर्याद मंदीराचे पुजारी -देवीदास गुरुनाथ गौडा, यांनी रोजी दिल्या वरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. यावेळी प्राचार्यांनी उपस्थित सर्वांना पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत परिसरातील पक्ष्यांसाठी त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.


 
Top