वाशी (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाल्याचे धक्कादायक, हृदयद्रावक वृत्त धडकताच वाशी शहर, तालुक्यावर धाराशिव जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी वाशी शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी(दि.28) रोजी सकाळ पासूनच सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने कडकडीत दिवसभर बंद ठेवले होते.

औषधांची दुकाने आणि दवाखाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता, हॉटेल, कपड्यांची आणि इतर सर्व दुकाने आणि कृषी सेवा केंद्रे पूर्णपणे बंद होते. वाशी शहर बंद आसल्याची बातमी ग्रामीण भागात कळताच  शहरातील छात्रपती शिवाजी महाराज चौक,पारा चौक,जुने तहसिल चौक व शिवाजी नगर बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top