उमरगा (प्रतिनिधी)-  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व राजकारणातील दादा व्यक्तिमत्व स्मृतिशेष अजितदादा पवार यांना समस्त उमरगेकरांच्या वतीने उमरगा शहरातील बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बारामती विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर त्यांचे विमान कोसळले. अजित दादांच्या निधनामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजित दादांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12 वाजता समस्त उमरगेकरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उमरगा शहरातील सर्व पक्षीय नेते, व्यापारी महासंघाचे सदस्य उपस्थित होते. उमरगा शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी बांधवानी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष किरण गायकवाड, भाजपाचे संताजी चालुक्य, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, सिद्रामप्पा चिंचोळे, प्रा.डॉ.शौकत पटेल, प्राचार्य डॉ.संजय अस्वले, बाबा जाफरी, वैशाली जाधव आदिनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.  यावेळी  दिलीप भालेराव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, प्रदिप चालुक्य, नितीन होळे, नेताजी कवठे, वैशाली जाधव, एम. ओ. पाटील, नगरसेवक सचिन जाधव, विजय दळगडे, शफी चौधरी, विशाल कानेकर, बाबा मस्के,  शरद पवार, बाबा औटी शंतनू सगर आदी उपस्थित होते.

 
Top