तुळजापूर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह नगरसेवक अमोल कुतवळ, रणजित इंगळे, आनंद जगताप, पंचायत समिती उमेदवार दत्ता शिंदे, सुजित हंगरगेकर, बाळासाहेब कदम, युसूफ शेख, नरेश पेंदे, सुदर्शन वाघमारे, विनोद सोंजी, दादा पाटील, पिंटू पंडागळे, शशिकांत पाटील तसेच असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत, जड अंतःकरणाने भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. 


 
Top