भूम (प्रतिनिधी)- 17 वयोगटात महाराष्ट्रच्या संघात भूमच्या वैष्णवी बाबर हीची निवड झाली व राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने व्दितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल राजे संभाजी पब्लिक स्कूल ईट यांच्या वतीने वैष्णवी राजभाऊ बाबर हीचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा डॉ अप्पासाहेब हुबे, प्राचार्य पवार, गोपाळ येळमकर, अक्षय बाराते, कुणाला भारती, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी तिचे प्रशिक्षक कबड्डी कोच अमर सुपेकर यांचा ही सत्कार करण्यात आला. 

 
Top