धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त धाराशिव शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठवाडा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत नामविस्तार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
मराठवाडा नामविस्तार आंदोलन हे केवळ नामविस्ताराचा नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठीचा ऐतिहासिक लढा होता, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. हा लढा समता, स्वाभिमान व सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर आधारित होता. या आंदोलनात अन्याय व दडपशाहीविरोधात लढताना अनेक भीमसैनिक शहीद झाले. त्यांच्या अमूल्य बलिदानामुळेच मराठवाड्याला स्वतंत्र व अभिमानास्पद ओळख मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शहीद भीमसैनिकांचे बलिदान हे केवळ इतिहासाचा भाग नसून आजच्या व भावी पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत सामाजिक अन्यायाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास आर.पी.(आय आठवले)महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी मा.राजाभाऊ ओव्हाळ,आर.पी.आय (सचिन खरात) जिल्हाध्यक्ष मा.राजाभाऊ राऊत, आर.पी.आय (आठवले) जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे,रंजीत गायकवाड,सिद्धार्थ ओव्हाळ,सोमनाथ गायकवाड, भालचंद्र कटारे,अशोक बनसोडे, मुकेश मोठे,सूर्यनंद बनसोडे, श्रीकांत गायकवाड,अमित सोनवणे,पालाश माने,रामकृष्ण वाघमारे,धम्मपाल बनसोडे,सुहास झेंडे,राजाभाऊ माळी,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजयकुमार गायकवाड, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
