धाराशिव (प्रतिनिधी)- पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार विभागाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आणीबाणीचे ते दिवस या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. भास्कर ब्रम्हनाथकर लिखित आणीबाणीचे ते दिवस या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. आणीबाणीच्या कटू आठवणी सांगून श्री ब्रम्हनाथकर यांनी लोकशाहीच्या मजबुतीसाठी प्रत्येक नागरिकाने काम करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी पत्रकार धनंजय रणदिवे आणि पत्रकार देविदास पाठक तसेच विश्व हिंदू परिषदेचे ॲड. गजानन चौगुले यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरएसएसचे जिल्हा कार्यवाह अजय जानराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
