धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विद्यापीठस्तरीय अविष्कार 2026 संशोधन प्रकल्प स्पर्धेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज धाराशिव येथील एम टेक (संगणक अभियांत्रिकी) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी ऐश्वर्या दत्तात्रय सक्राते हिने आपल्या उत्कृष्ट संशोधन प्रकल्पाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
अविष्कार झोनल लेवल राऊंड झाला होता. त्यामध्ये तेरणा अभियांत्रिकीचे सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले होते. पदव्युत्तर गटातून सक्राते ऐश्वर्या, अंकिता शिंदे, अर्चना उडाणे, अनुराधा पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. तर लेवल युजी मधून सायली साळुंखे हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक आशिष थोरात, दीक्षा मस्के यांनी मिळवले होते. हेच विद्यार्थी पुढे 6 जानेवारी 2026 रोजी यूनिवर्सिटी लेवल राऊंड साठी सादरीकरणासाठी गेले असून त्यामध्ये पदव्युत्तर गटातून ऐश्वर्या सक्राते हिने सुवर्ण पदक पटकावले. ऐश्वर्या हिच्या यशाने नक्कीच नवीन पिढीला संशोधनाच्या मार्गाला लागण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले.
अविष्कार 2025-26 चे समन्वयक व डी.आर.एन डी. डॉ.सुशीलकुमार होळंबे, सह समन्वयक प्रा. रवींद्र गुरव, प्रा. यु. जे. जाधव, डॉ. राजश्री यादव, प्रा.डी.बी ठाकूर, प्रा.डी.बी भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे,, डॉ.आर.बी.ननवरे या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल माजी गृहमंत्री तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील, मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील, सर्व विश्वस्त, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी ऐश्वर्या दत्तात्रय सक्राते हिचे अभिनंदन केले.
