धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन येथील श्रीतुळजाभवानी सैनिक विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संघरत्न सुभाष नगदेच्या प्रयोगास प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, धाराशिव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन श्रीतुळजाभवानी सैनिक विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या संघरत्न नगदे याच्या प्रयोगास प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या प्रदर्शनात संघरत्न नगदे याने कचरा व्यवस्थापन या विषयावर प्रयोग सादर करण्यात आला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संघरत्न नगदे या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमास तहसीलदार अरविंद बोळंगे गटविकास अधिकारी महेंद्रकुमार भिंगारदेवे , सहाय्यक गटविकास अधिकारी सीमा गवळी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांच्यासह गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव, दिनकर होळकर, संतोष माळी, सुधाकर कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
