परंडा (प्रतिनिधी)-  मराठवाड्यात स्थापन झालेले विद्यापीठ हे केवळ ज्ञानदानाचे केंद्र नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे असे प्रतिपादन प्रा.पवार यांनी केले.शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला.मराठी व प्रमुख प्रा.डॉ गजेंद्र रंदिल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने उपस्थित होते. 

याप्रसंगी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, प्रशासकीय अधिकारी  भाऊसाहेब दिवाने, मराठी विभाग प्रमुख डॉ.गजेंद्र रंदिल, डॉ बाळासाहेब राऊत, डॉ.कृष्णा परभणे, डॉ. अरुण खर्डे, प्रा.डॉ संतोष काळे, प्रा तानाजी फडतरे, प्रा.शंकर कुटे, प्रा.उत्तम माने यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिव यांनी केले तर आभार प्रा.उत्तम माने यांनी मानले.

 
Top