कळंब (प्रतिनिधी)- नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ. सुनंदा शिवाजी कापसे व शहरातील सर्व नगरसेवकांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या वतीने शिक्षक भवन कळंब येथे भव्य सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यास नूतन नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्यासह नगरसेवक भूषण करंजकर,शितल चोंदे, हर्षद अंबुरे, रोहन पारख, अतुल कवडे, सागर मुंडे, अमर चाऊस, आशा भवर, अर्चना मोरे, योजना वाघमारे, ज्योती हरकर,जमील कुरेशी इंदुमती हौसमल, लखन गायकवाड, सफुरा काझी, पूजा धोकटे, वनमाला वाघमारे,मोहसीन मिर्झा, रुकसाना बागवान, शीला पवार, या नवनियुक्त नगरसेवकांचा फेटा,शाल, पुष्पगुच्छ, श्यामची आई पुस्तक, संस्थेची स्मरणिका, दिनदर्शिका देऊन गौरव करण्यात आला. 

 याप्रसंगी शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आपल्या मनोगतातून शहर व तालुक्यातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच पूर्वीप्रमाणे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कळंब शहराचा लौकिक वाढावा. नगरपालिकेच्या शाळा सुसज्ज करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना पुढील पाच वर्षांमध्ये चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांनी सत्काराला उत्तर देताना कळंब शहरांमध्ये स्वच्छता, आरोग्य,शांतता व सुव्यवस्था करण्यासाठी तसेच शैक्षणिक प्रगती व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव प्रयत्न करून नगरपालिकेच्या शाळा सुसज्ज करून नवा कळंब पॅटर्न केला तयार जाईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी नगरसेवक हर्षद अंबुरे, अमर चाऊस, आशा भवर व रुकसाना बागवान या सर्वांनी शहराच्या प्रगतीसाठी नगराध्यक्षांना वेळोवेळी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली.

 याप्रसंगी राज्यसंघाचे चिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बारकुल, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने , शिक्षक पतसंस्थेचे जेष्ठ संचालक दत्तात्रय पवार तालुका अध्यक्ष प्रशांत घुटे, पतसंस्थेचे संचालक भूषण नानजकर,अशोक डिकले, गणेश कोठावळे, दीपक चाळक, महादेव मेनकुदळे, प्रशांत निन्हाळ,अविनाश खरडकर, संतोष लिमकर, सचिन पवार, संदीप मगर, अशोक बिक्कड, सुबराव कांबळे,डी. ओ. पवार, बजरंग गिरी, राजाभाऊ शिंदे श्रीअंश पांगळ, संतोष ठोंबरे जनार्धन धुमाळे, सचिन तामाने, पांडुरंग टेळे, राजेश जाधव, संतोष मोहिते, नवनाथ तुंदारे,मुकुंद नांगरे संजय तांबारे, उत्तरेश्वर शिंदे , दत्तात्रय वायकर, विश्वनाथ सावंत, युसुफ पठाण, हरिभाऊ मोरे, बालाजी पवार, संतोष पवळ, किशोर गायकवाड, अशोक पांचाळ शिवाजी शिंदे, अण्णासाहेब जगदाळे, प्रशांत पोते,राहुल तामाने, कृष्णा जाधव, महिला आघाडीचे अध्यक्ष वैशाली शिरसागर, ज्योती ढेपे, प्रतिभा पवार, अर्चना घुटे, सिंधू तांबारे, कोंडाबाई भंडारे, सुषमा हंडीबाग, प्रतिभा बिडवे, सविता मेटे, सोनाली पाटील, सुवर्णा डिकले, पुष्पा बुरकुले, महादेवी झाडे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अनिल शिंदे व महादेव खराटे यांचाही गौरव

क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कळंब तालुका पत्रकार संघा हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल श्री अनिल शिंदे व संजीवनी फाउंडेशन नाशिकचा महाराष्ट्र गौरव शिवछत्रपती पुरस्कार महादेव खराटे यांना जाहीर झाल्याबद्दल दोघांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती ज्योती ढेपे सूत्रसंचालन शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष प्रशांत निन्हाळ तर आभार तालुकाध्यक्ष प्रशांत घुटे यांनी मानले.

 
Top