धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 08,10,12,14 वर्षाखालील गटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय सब- ज्युनियर स्पर्धेसाठी धाराशिव ज़िल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व जागर फाउंडेशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथे दि. 19 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
यामध्ये 08 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - 50 मी ,100 मी धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप , 10 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा 50 मी ,100मी धावणे , स्टँडिंग ब्रॉड जंप , गोळा फेक, 12 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - 60मी , 300मी धावणे , स्टँडिंग ब्रॉड जंप , गोळा फेक व 14 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा - 80 मी 300 मी धावणे,लांब उडी,गोळा फेक या स्पर्धा होणार आहेत यास्पर्धेमधून विजयी खेळाडू मुले व मुलींची निवड धाराशिव जिल्हा संघात केली जाणार आहे.खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जल्म दाखला (नगरपालिका/ग्रामपंचायत) सोबत आणावे. या लिंक वर https://forms.gle/AQSmn78xBaZo9nvf8 नोंदणी करावी.
08 वर्ष - 09/02/2018 ते 08/02/2020, 10 वर्ष- 09/02/2016 ते 08/02/2018,12 वर्ष-09/02/2014 ते 08/02/2016, 14 वर्ष - 09/02/2012 ते 08/02/2014 दरम्यान जन्मदिनांक असणारे सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17/01/2026 पर्यंत आहे. यासाठी राजेंद्र सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये सदस्य म्हणून सुरेंद्र वाले, मुनीर शेख ,राजेश बिलकुले, ज्ञानेश्वर भुतेकर ,सचिन पाटील, रोहित सुरवसे, ऋषिकेश काळे, छाया घोडके, योगिनी साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून संजय कोथळीकर यांची निवड करण्यात आली आहे. या अजिंक्य पद स्पर्धा व निवड चाचणी मध्ये अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी माऊली भुतेकर (9404193674), रोहित सुरवसे (7796756866), शितल देशमुख सर (8788416603) यांच्याशी संपर्क साधावा.