धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे व्हॉइस चान्सलर डॉ.कारभारी काळे यांनी नुकतेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील व विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या कौशल्य विकासाच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. प्रसंगी, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी स्वागत करून महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्र, विविध प्रयोगशाळा (अँपल लॅब, ड्रोन सेन्टर, सिस्को सेन्टर, एफ.एम. रेडिओ सेन्टर इ.) व नवीन उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख तसेच भविष्यातील योजनाही स्पष्ट केल्या.
या कार्यक्रमात कौशल्य विकासात योगदान देणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. सिम्बॉयसिस स्किल सेन्टरमार्फत जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट अभ्यासक्रम पूर्ण करून इन्फोसिसमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. बिझनेस आयडिया स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांचा तसेच सरकारी नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. काळे यांनी तेरणा ट्रस्टची विविध क्षेत्रांतील भूमिका कौतुकास्पद असल्याचे सांगून गौरव केला. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. माने यांनी सिम्बॉयसिस स्किल व प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्याशी केलेला करारामुळे विविध क्षेत्रात त्यांची मदत होणार आहे असे सांगितले. व्हॉइस चान्सलर यांच्या भेटीबाबत मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले. तर आभार बेसिक सायन्स अँड हुमानिटीच्या विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे यांनी मांनले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, बी फार्मसी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.प्रीती माने, एआयडीएस विभागाचे विभाग प्रमुख प्रा.पी एम पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. अशोक जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा.संदीप टेकाळे, प्रा.संदीप नलगे, कार्यालय अधीक्षक हेमंत निंबाळकर, प्रा. डी डी मुंडे, रामेश्वर मुंडे, पी एम महाजन यांनी नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे कौशल्य विकासा बाबत उपस्थितामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
