तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील सहाव्या माळी दिनी पौष शुक्ल पक्ष 14 चतुर्दशी विश्वावसू नाम संवत्सरे शके 1947 शुक्रवार दि. 02 जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.
ती पूजा मांडण्याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानी मातेने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध
केला.त्यामुळे महिषासूर मर्दिनी ह्या स्वरुपात देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते. श्री तुळजाभवानी मातेच्या कंबरी नवरात्र महोत्सवातील देवीचा वार शुक्रवार पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी दर्शनाला भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती. आजही दर्शन अभिषेक मुखदर्शन सशुल्क दर्शन वाहिल्या. रात्री श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रांगणात काढण्यात आल्यानंतर महंत वाकुजी बुवा, गुरु तुकोजी बुवा यांनी प्रक्षाळ पूजा केल्यानंतर सहाय्या माळीच्या धार्मिक विधीचा सांगता झाला.

