तेर (प्रतिनिधी)- स्वत: कष्ट करून स्वावलंबी बनावे व उद्योजक बनावे असे आवाहन अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी केले. 

धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण (अमृत)पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृताच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी मोफत रेडिमेड गारमेंट्स अँड फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी दिपक जोशी बोलत होते.यावेळी बोलताना उद्योजिका भाग्यश्री निंबाळकर म्हणाल्या की, मला कांहींतरी बनायचय हे ध्येय महीलांच्या अंगी असले पाहिजे असे प्रतिपादन केले.यावेळी ॲड.शिरीष देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त केले.प्रास्ताविक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे यांनी केले तर सुत्रसंचलन यश देशपांडे यांनी केले. तर अभार ॲड.अश्विनी देशपांडे यांनी मानले. यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी, जिल्हा उप व्यवस्थापक अजय कुलकर्णी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 
Top