भूम (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी गॅदरिंग निमित्त शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे विविध मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ. संतोष शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे, डॉ. तानाजी बोराडे, समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे व डॉ. अशोक दुनघव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये 100 मीटर मुले या स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश मुंडेकर, द्वितीय क्रमांक, विशाल जाधव, तृतीय क्रमांक अभिषेक कांबळे या विद्यार्थ्यांनी मिळवला. तसेच गोळाफेक मुली स्पर्धेत प्रथम क्रमांक भक्ती कराळे, द्वितीय क्रमांक कोमल बोराडे, तृतीय क्रमांक महादेवी जाधव या विद्यार्थ्यांनी मिळवला.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक प्रा. महेश सूर्यवंशी, प्रा. राहुल राठोड, प्रा. नंदू जगदाळे, प्रा. मंगेश खराटे, प्रा. अमोल कुटे, प्रा. हरी महामुनी, प्रा. अक्षयकुमार डोंगरदिवे, प्रा. रमेश गायकवाड, प्रा. नवनाथ भोंग, डॉ. शामसुंदर आगे, डॉ.शिवशंकर माळी, प्रा.जयेश मसराम प्रा.लक्ष्मण पवार, डॉ.शितल अलगुंडे, डॉ.राजश्री तावरे, प्रा. पूनम सुतार, प्रा. दिप्ती गिरी तसेच इतर प्राध्यापकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
