धाराशिव (प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक स्वराज्य ध्वजस्तंभाच्या कामाची तसेच मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी केली.
शिवजयंती उत्सव हा केवळ उत्सव न राहता शिवरायांच्या विचारांचे संस्कार समाजात रुजावेत, या हेतूने विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वधर्मीय सामुदायिक बिगरहुंडा विवाह सोहळा, समाजजागृतीपर उपक्रम व प्रेरणादायी कार्यक्रमांद्वारे शिवजयंती अधिक अर्थपूर्ण व स्मरणीय करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.