भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिर वालवड येथे आयोजित केलेले आहे. पाचव्या दिनाचे पुष्पगुंपताना सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन हे शिव संकल्प प्रतिष्ठान वालवड व राष्ट्रीय सेवा योजना शंकराव पाटील महाविद्यालय भूम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेले होते. नंतर दुपारच्या सत्र मध्ये प्राध्यापक नितीन कोळेकर सर यांनी पानिपत ही एक पराभवाची मालिका नसून तर एक शौर्याची गाथा आहे. पानिपत हे एक शौर्यतीर्थ आहे हे त्यांनी आपल्या  व्याख्यानातून पानिपत स्मृतीला उजाळा देऊन सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जगदाळे मॅडम, प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सहसचिव डॉक्टर एस एस शिंदे सर, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ, टी आर बोराडे,शिव संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन मोहिते,सचिव सचिन धुमाळ, संदीप पाटील, प्रशांत शेळके , राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ नितीन पडवळ, प्रा. दिप्ती गिरी उपस्थित होते. या सूत्रसंचालन प्रा, एन आर जगदाळे यांनी केले तर आभार डॉ. नितीन पडवळ यांनी केले.


 
Top