परंडा (प्रतिनिधी)- आज देशाला जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. प्रत्येक घरात एक जिजाऊ जन्माला आली तर प्रत्येक घरात एक शिवाजी घडेल असे प्रतिपादन प्रा.गंगाधर बनबरे पुणे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालय परांडा येथे आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ जयंती निमित्त व्याख्यानात व्यक्त केले. जिजाऊ संस्कार प्रबोधिनी परंडा व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा .गे. शिंदे महाविद्यालय परंडा याच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंती समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रा.गंगाधर बनबरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विलास घुमरे ,सचिव विद्या विकास मंडळ करमाळा तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर सौ. सुरजा बोबडे सरपंच टेंभुर्णी तथा सचिव माऊली शिक्षण प्रसारक मंडळ व समाजसेवक मंडळ टेंभुर्णी, प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने सौ.मनीषा रणजीत पाटील, जिजाऊ संस्कार प्रबोधिनीचे संस्थापक भारत घोगरे गुरुजी, सौ.कल्पना रवी मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ तसेच परंडा शहर व तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील श्रीमती आशा मोरजकर, विमल भातलवंडे, अनिता रोडगे, देवानंद टकले, काकासाहेब साळुंखे, अंगद धुमाळ , पत्रकार सुरेश घाडगे, प्रमोद वेदपाठक, राजेंद्र कुमार निकाळजे, महावीर तनपुरे, तन्मय राम शिंदे, महावीर काशीद यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील कु.अक्षता खराडे, रेहान बेग, प्राची गणगे या विद्यार्थिनींना एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार या करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संभाजी धनवे यांनी केले प्रास्ताविक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर प्रा शंकर अंकुश यांनी आभार मानले.
