तुळजापूर (प्रतिनिधी)- नवी मुंबई येथील भाविक सतीश नारायण हिरे हे आज सहकुटुंब श्री क्षेत्र तुळजापूर येथे दाखल झाले. त्यांनी आपली कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर हिरे कुटुंबीयांनी देवीचरणी आपली भक्ती अर्पण करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला रोख स्वरूपात 51 हजार रुपयांची देणगी दिली.

त्यांच्या या धार्मिक व सेवाभावी कार्याबद्दल मंदिर संस्थानच्या वतीने हिरे कुटुंबीयांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा व महावस्त्र भेट म्हणून देण्यात आले. मंदिर संस्थानच्या वतीने हिरे कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले. यावेळी सहायक जनसंपर्क अधिकारी अतुल भालेराव, उमाकांत क्षीरसागर तसेच संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 
Top