वाशी (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत बुधवारी दि.21 जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जि.प.च्या तीन गटासाठी 35 उमेदवारांनी 45 अर्ज तर पंचायत समितीच्या 6 गणांसाठी 55 उमेदवारांनी 67 अर्ज दाखल केले आहेत.
पारगाव जिप गटासाठी दहा उमेदवारांचे अकरा अर्ज, पारा जिप गटासाठी अकरा उमेदवारांचे सोळा अर्ज आणि तेरखेडा गटासाठी चौदा उमेदवारांचे अठरा अर्ज दाखल झाले. पंचायत समितीच्या पारगाव गणात सहा उमेदवारांचे सात अर्ज, सरमकुंडी गणात सात उमेदवारांचे आठ अर्ज, पारा गणासाठी पंधरा उमेदवारांचे सोळा अर्ज, बावी गणासाठी अकरा उमेदवारांचे तेरा अर्ज दाखल करण्यात आले. इंदापूर गणासाठी दहा उमेदवारांचे तेरा अर्ज तर तेरखेडा गणासाठी सहा उमेदवारांचे दहा अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर निडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.