तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी भेट दिली.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी श्री संत गोरोबा काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयास भेट देऊन पुरातन वस्तूची पहाणी केली.यावेळी ग्राम मंडळ अधिकारी शरद पवार, तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख उपस्थित होते.
