धाराशिव (प्रतिनिधी)-  सोशल मिडीयावर मतदानापूर्वीचा मतदारांचा कौल असे सांगत एका पक्षाला बहुमत दाखविण्यात आले आहे. हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गोविंद कोलगे व राकेश हनुमंतराव सुर्यवंशी यांनी केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्या, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी धाराशिव नगर परिषदचे मतदान नियोजित आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू असतानाही, काही समाजमाध्यमांवरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. 'धाराशिव 2.0' या सोशल मिडीया पेजवर नियमबाह्य पद्धतीने ओपीनिंयन पोल प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये एका बनावट टीव्ही चॅनलचा रिपोर्ट वापरून खालील दावे करण्यात आले आहेत:

भाजपच्या उमेदवार नेहा काकडे या विजयी होणार असल्याचे भासवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार परवीन खलिफा कुरेशी या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दाखवले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदानापूर्वी ओपिनिंयन पोल प्रसिद्ध करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे आणि आदर्श आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे.  याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


 
Top