भूम (प्रतिनिधी)- दी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत व सेवा सेवक फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने भूम तालुक्यातील 125 मुलींना सायकलिंचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल भट्टी गटशिक्षणाधिकारी भूम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप शाळू अध्यक्ष अलंप्रभु देवस्थान कमिटी, रमेश मस्कर संचालक अलंप्रभु देवस्थान कमिटी, सूर्यकांत साळुंखे विस्ताराधिकारी पंचायत समिती भूम, प्रमुख उपस्थिती विनोद सुरवसे जिल्हा समन्वयक सेवा सहयोग फाउंडेशन तथा श्रीराम केसकर जिल्हा प्रतिनिधी सेवा सहयोग फाउंडेशन हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष तोडकरी यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ तर आभार प्रदर्शन विजय माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप मोरे, अशोक बनसोडे, बालाजी गुंजाळ, बालाजी गिलबिले, फैजान काझी यांचे विशेष सहकार्य लाभले.
