भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलने आठवी वर्गाच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत संपादन केले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत 15 विद्यार्थ्यां उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केला होता. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला महापुरुषांच्या चरित्राचे पुस्तक भेट देण्यात आले.
पालकांच्या सहमतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा पालक आयशा शेख तर प्रमुख अतिथी म्हणून पालक अमोल जगदाळे यांची निवड करण्यात आली होती. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गुणानुक्रमे प्रथम चंदन अमोल जगदाळे. द्वितीय अदिती अर्जुन मदने, तृतीय निरंजन महादेव माळी व अदिती अंगद गुंजाळ, वैष्णवी विनोद शेळके, साठे प्राजक्ता नितीन, कुणाल वैभव सानप, कल्याणी सुनील मोरे, आदर्श बाजीराव खबुत्रे, युवराज त्रिंबक कांबळे, कुणाल नामदेव कांबळे, नगीना रहीम सय्यद ,आदित्य शिवाजी चोरमले, इबादुर रहेमान सरफराज शेख, स्वराज शिवाजी गुंजाळ, साबळे प्रगती रेवण यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक तसेच शाळेतील मुख्याध्यापक तात्या कांबळे, काकासाहेब पवार, दयानंद पाटील, उत्रेश्वर पायघन, अविनाश जोशी, राजेंद्र गाडे , दत्तात्रय गुंजाळ, प्रतिभा मुकटे, सुनील जाधवर, नितीन पवार, कैलास शिंदे, हरीश साठे, सागर आकोस्कर अनंता झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. तर आभार अविनाश जोशी यांनी मानले.
