धाराशिव, (प्रतिनिधी) - येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने प्रथमच श्री. ब्रह्म भूषण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. रविवार, १४ डिसेंबर रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट ही संघटना मागील कांही वर्षापासून समाजासाठी विविध उकप्रम राबवित आहे. यामध्ये सामुदायीक उपनयन संस्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार, भांडी बँक, अन्नसेवा व इतर सामाजिक उपक्रम राबवित आहे. याला समाजाचा मोठा प्रतिसादही मिळत आहे.
यावर्षी पासून संघटनेच्या वतीने ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींचा श्री. ब्रह्म भूषण सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षी हा कार्यक्रम रविवार, १४ डिसेंबर रोजी परिमल मंगल कार्यालयात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खातगाव येथील श्री. समर्थ रामदासस्वामी मठातील श्री. समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशुराम आर्थिक विकास महामंडाळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले तर परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठीचे उपोषणकर्ते दिपक रणनवरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
यांचा होणार सन्मान
ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या वतीने आयोजित श्री. ब्रह्म भूषण सन्मान सोहळ्यात डॉ. उर्मिला गजेंद्रगडकर, रंगनाथ कुलकर्णी, डॉ. राघवेंद्र डंबळ, भारत मसलेकर, राजेंद्र अत्रे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.