धाराशिव (प्रतिनिधी)- येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या कार्यकारणी विस्ताराची बैठक दि.10/12/25 रोजी संपन्न झाली. साहित्य परिषदेचे सदस्य डॉ. अभय शहापूरकर साहित्य परिषदेचे सदस्य तथा लेखक भा. न. शेळके, साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष नितीन तावडे त्याचबरोबर साहित्य परिषदेचे सचिव बालाजी तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच इतर सदस्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारणी विस्ताराची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील मराठी विषयाचे प्राध्यापक तथा कवी, लेखक, समीक्षक डॉ. अरविंद हंगरगेकर यांची मराठवाडा साहित्य परिषद शाखा धाराशिवच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या व संस्थेच्यावतीने त्यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. डॉ. मंगेश भोसले परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. माधव उगिले ,मराठी विभागाचे प्रमुख प्रा. राजा जगताप, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. साळुंखे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ .बाबासाहेब मोरे ,वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. बालाजी नगरे तसेच इतर गुरुदेव उपस्थित होते.
