तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या 29 नोव्हेंबरच्या दौऱ्यात तामलवाडी येथे अनपेक्षितपणे मोठी परिस्थिती निर्माण झाली.
बसथांब्यावर उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी एस.टी. महामंडळाच्या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध करत मंत्र्यांना थेट अडवून तक्रारींचा पाढाच वाचला. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या तक्रारीचा पाढा वाढताना म्हणाले की सोलापूर, धाराशिव, लातूर या सर्व विभागांच्या जलद व रातराणी बसेस तामलवाडी येथे थांबत नाहीतचालकवाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये घेत नाहीतप्रवाशांना 22 तास उभे राहण्याची वेळवारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासकीय अधिकारी दखल घेत नाहीततामलवाडी पंचक्रोशीतील 1012 ग्रामपंचायतींनी मिळून मंत्री सरनाईक यांना थेट निवेदन सादर केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्र्यांकडून मिळालेले हे थेट आश्वासन विद्यार्थ्यांना दिलासा देणारे ठरले. यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला. “बसमधील अन्यायकारक वागणूक थांबली नाही, थांबे निश्चित झाले नाहीत, तर 15 दिवसांनी ‘रास्ता रोको आंदोलन' पेटवू!”यावेळी तामलवाडी, गंजेवाडी मार्गावरील
निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण याबद्दलही शेतकऱ्यांनी निवेदन देत चौकशी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. मंत्र्यांनी यावर देखील सकारात्मक प्रतिसाद देत “तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी मी तातडीने कारवाई करतो.”असे आश्वासन दिले.
विशेषतः मुलींच्या तक्रारींनी मंत्री महोदयांनी परिस्थितीची गंभीरता ओळखली. मुलींनी माझ्या टोल-फ्री नंबरवर फोन करा, मी सर्वांना सरळ करतो.
” प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
