धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी आज दि.2 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरूवात झाली. पहिल्या सहा तासांत जिल्ह्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी समोर आली असून, तुळजापूर व मुरूम मध्ये मतदानाची टक्केवारी धाराशिव पेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत 40 टक्के च्या पुढे मतदान झाले होते तर धाराशिव मध्ये फक्त 31टक्के इतकेच मतदान झाल्याचे झाल्याचे दिसत होते. दुपारी दीड वाजेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी एकूण 38.42 टक्के मतदानाची नोंद झाली असून, दुपारी तीननंतर मतदानाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळच्या पहिल्या दोन तासांत अनेक मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा दिसून आल्या. मात्र सकाळी अकरानंतर मतदानाचा वेग मतदारांना मतदान प्रक्रिया लक्षात येत नसल्यामुळे मंदावल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळेत मतदारांचे प्रमाण कमी असले तरी दुपारी तीननंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत आणि सुरळीत मतदान सुरू आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी धाराशिव शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. 


पहिल्या सहा तासांतील मतदानाचे प्रमाण 

धाराशिव नगरपालिका  31.45 टक्के तुळजापूर  47.98 टक्के, नळदुर्ग  40.44 टक्के, उमरगा 38.51 टक्के, मुरूम 47.55 टक्के, कळंब  38.41 टक्के, भूम  46.94 टक्के, परंडा  41.50 टक्के.

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान तुळजापूर आणि मुरूम (सुमारे 48 टक्के) येथे नोंदविले गेले आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 43 हजार मतदारांपैकी आतापर्यंत 93,618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये  पुरुष मतदार 48,802, महिला मतदार  44,807 इतके दुपार पर्यंतचे आहे. तर


नगरपालिकानिहाय मतदान झालेल्या मतदारांची संख्या

दुपार पर्यंत धाराशिव 29,564, तुळजापूर  14,182, नळदुर्ग  6,924, उमरगा  12,242, मुरूम  7,095, कळंब  8,051, भूम  8,485, परंडा  7,075 इतके मतदान झाले होते. तर 


तीन मतदानामुळे वेळ                 

धाराशिव शहरात प्रत्येक प्रभागात तीन मतदान करणे आवश्यक आहे एक नगराध्यक्ष पदासाठी व दोन नगरसेवक पदासाठी त्यामुळे ईव्हीएम मशीनचा आवाज येण्यास उशीर होत असल्याने मतदानाची गती मंदावली होती.


 
Top