तुळजापूर (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य प्रा. डॉ.प्रवीण भाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.राजेश बोपलकर, प्रा. स्नेहा ठाकूर व सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त प्रास्ताविक व संविधान वाचन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रवीण भाले यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद गायकवाड तसेच डॉ. श्रीरंग लोखंडे यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी जेटीथोर तसेच आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश बोपलकर यांनी केले.
