भुम (प्रतिनिधी)- परांडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन, शहीद दिन, महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान गटासाठी (इयत्ता पहिली ते चौथी)रंगभरण स्पर्धा स्पेलिंग बी, श्रुतलेखन स्पर्धा तर मोठ्या गटासाठी (इयत्ता पाचवी ते सातवी) संविधान ज्ञान स्पर्धा, घोषवाक्ये स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा इत्यादी स्पर्धा संपन्न झाल्या. 

यामध्ये शिवण्या कांबळे, ईश्वरी मारकड, प्रथमेश नवले, तन्वी औताडे, शुभ्रा नवले, श्रावणी ठोंगे, शिवण्या सामिंदर, वेदिका भोसले, शंभुराजे नवले, प्रतिज्ञा समिंदर, शिवानी गोरे, रणवीर सरपणे , आनंद सरपणे, अपेक्षा समिंदर, धनश्री समिंदर, ग्रंथराज सुतार, गौरी मारकड, पांडुरंग औताडे, वैभव समिंदर, गौरव शेटे, करण समिंदर, अपेक्षा मारकड, आयेशा मुलाणी, ऐश्वर्या नवले या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना ॲड ज्ञानेश्वर लोखंडे, महेश काका ठोंगे, गणेश नवले, नागेश औताडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शालेय शैक्षिणक साहित्य देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अंधारे यांनी केले तर आभारप्रदर्शन उज्वला बावकर यांनी केले.

 
Top