कळंब (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र असलेल्या येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आलेल्या प्रशासकीय व शैक्षणिक अंकेक्षण तपासणीत महाविद्यालयाला 'अ' ग्रेड प्राप्त झाला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट देऊन विविध निकषांवर सखोल तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा आढावा घेण्यात आला: अध्यापन व संशोधन: नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि संशोधनाला दिलेले प्रोत्साहन. पायाभूत सुविधा: महाविद्यालयातील सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि शैक्षणिक वातावरण. विद्यार्थी विकास: प्लेसमेंट सेल, सांस्कृतिक उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धा. प्रशासकीय शिस्त: आर्थिक पारदर्शकता आणि प्रभावी अंतर्गत गुणवत्ता हमी प्रणाली. समितीने महाविद्यालयातील 'विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन' आणि गुणवत्ता सुधारण्यातील सातत्याबद्दल विशेष कौतुक केले आहे.
सामूहिक प्रयत्नांचे फलित
या यशामागे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल मोहेकर, उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर व सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या नेतृत्वाखाली उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, नॅक समन्वयक प्रा. ए. आर. मुखेडकर, कमिटी सदस्य डॉ.महाजन, डॉ.मीनाक्षी जाधव, प्रा.अंकुशराव, डॉ.वेदपाटक, डॉ.राठोड, डॉ. पावडे, डॉ. साठे, डॉ. वाळके, डॉ. चांदोरे, डॉ.फाटक, डॉ. साको साकोळे, डॉ.सूर्यवंशी, डॉ.गुंडरे, डॉ सावंत, डॉ अदाटे, डॉ.उंदरे, डॉ.ढोले, डॉ. भोसले, डॉ.म्हस्के, अधीक्षक हनुमंत जाधव, संतोष मोरे, अरविंद शिंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजित कामाचे हे फळ मानले जात आहे.
