धाराशिव, (प्रतिनिधी)- शहारातील तेरणा अभियांत्रिकी येथे असलेल्या आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या द्वारा निर्मित तेरणा रेडिओ 90.4 चा 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त देवगिरी प्रांत धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेली दैनंदिनी देऊन या प्रसंगी तेरणा रेडिओचे प्रमुख संजय मैंदर्गी कार्यक्रम प्रमुख रमेश पेठे आरजे निवेदिका प्रगती शेरखाने यांना शुभेच्छा देण्यात आले. जिल्हा संस्कार भारतीचे देवगिरी प्रांत पदाधिकारी दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ जिल्हा संरक्षक प्रभाकर चोराखळीकर, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा संगीत विधा प्रमुख सुरेश वाघमारे , शहर संयोजक शरद वडगाकर उपस्थित होते आदि कला साधक उपस्थित होते.
