भुम (प्रतिनिधी)-  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या असतात त्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती व जिल्हा परिषद वर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. असे आवाहन भूम परंडा वाशी विधानसभासंपर्क संजय नटे यांनी केले आहे.

ज्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी झालेले नाही किंवा कार्यकर्ते सक्रिय नाही त्या ठिकाणी नूतन पदाधिकारी संदर्भातही पारदर्शक अहवाल घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपले असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अगोदरच मोर्चे बांधणी सुरू केल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

भूम - परांडा - विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषद गट निहाय पदाधिकारी शाखाप्रमुख यांच्याबरोबर बैठका करून  संघटनात्मक बांधणी करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे प्रत्येक विधानसभा संपर्कप्रमुखांना पारदर्शकपणे संघटनात्मक बांधणीचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत .लोकसभा व विधानसभा निवडणूक नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख विभाग प्रमुख उपतालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी यांनी गाव पातळीवर बूट  स्ट्राँग करून  येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा संकल्प केला आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख रंजीत पाटील  भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे ,परांडा तालुका प्रमुख मेघराज पाटील ,वाशी तालुकाप्रमुख तात्यासाहेब गायकवाड  उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे विधानसभाप्रमुख प्रल्हाद आडागळे धाराशिव जिल्हा सहसंघटक  भगवान बांगर ,विधानसभा समन्वयक दिलीप शाळू माजी शहर प्रमुख दीपक मुळे , सरपंच परिषदेचे कोहिनूर सय्यद 'परंडा शहर प्रमुख  रईस मुजावर ' विहंग कदम ,संभाजी गरड ,राजु विर , पिंटू माळी , शहाजी जगदाळे , अंगद जगदाळे ,बापूसाहेब कावळे ,श्रीमंत बडके ,रफिक तांबोळी 'अब्दुल सय्यद ' अजित तांबे ,गणपत डोळस ,गजेंद्र खुणे अनिल तिकडे अविनाश गटकळ, श्रीमंत डोके,राजाभाऊ नलावडे,संभाजी विर,राजु विर, अँड विनायक नाईकवाडी, प्रभाकर डिसले,माऊली शाळु, बाळासाहेब गुळवे, ईतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.


 
Top