तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था यांच्यावतीने श्री. तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सव निमित्त 10 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा स्पर्धा , “ स्पर्धा तुळजाभवानीची, वक्ता महाराष्ट्राचा“ या स्पर्धेच्या विषय पत्रिकेचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर ,अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर , उपजिल्हाधिकारी शिरीष यादव , उपसंचालक माहिती व जनसंपर्क महासंचलनालय विवेक खडसे , पत्रकार धनंजय रणदिवे, प्रशांत कावरे आदि उपस्थित होते. यावेळी युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी स्पर्धेविषयी व स्पर्धेतील विषयांविषयी माहिती सांगितली.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्पर्धेतील निवडलेले विषयाचे कौतुक करून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्व स्पर्धकांना व संयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पर्धा प्रमुख भैरवनाथ कानडे उपस्थित होते.
“स्पर्धा तुळजाभवानीची, वक्त महाराष्ट्राचा“ या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेसाठी केंद्रीय सहकारिता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार निलेश लंके, हास्य सम्राट प्रा. दिपक देशपांडे ,सिने कलावंत शंतनू गंगणे , उमेश जगताप , युवा भारूडकार कृष्णाई उळेकर यांनी पत्राद्वारे व सोशल मिडीयाबाईटद्वारे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्व स्पर्धकांना व संयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
