धाराशिव (प्रतिनिधी)-  दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे. दिव्यांग हक्क अधिनियम हा कायदा देखील आहे. या कायद्याने त्यांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य हे निश्चित केले आहे. दिव्यांग बांधव हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळवून देताना त्यांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. 

जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पूजार बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील, केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण समितीचे सदस्य सुरेश पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी सचिन इगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, नवजीवन अपंग प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आप्पा ढोके व प्रहार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मयूर काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

न्यायाधीश पाटील सुरेश पाटील, डॉ.हरिदास, अस्थिरोग तज्ञ डॉ.संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, व्यंकट लामजाने, दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी काशिनाथ शिंदे यांनी भाषण केले.कार्यशाळेला विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे कर्मचारी, दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वैशाली आव्हाड यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी मानले.

 
Top